ZP Elections 2025 : पुणे जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, आरक्षणात बदल; इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी

ZP Elections 2025 : पुणे जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, आरक्षणात बदल; इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी


Pune जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकांवर प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षणदेखील नव्याने करावे लागणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलैला जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केला होता. त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या. या मुदतीत एकूण २१७ हरकती नोंदवण्यात आल्या. प्रारूप रचनेवर जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला.

यापुढे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मध्ये ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने जागा आरक्षित केल्या जातील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी गट आणि गणांच्या आरक्षणाची प्रक्रिया नव्या नियमांनुसार केली जाणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अद्याप आरक्षण सोडतीबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही; मात्र, त्या सूचना आल्यानंतर या नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया राबवली जाईल.
Previous Post Next Post

Comments System

Facebook