दिनांक : १५ ऑगस्ट २०२५
स्थळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार भवन, पुणे
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहराच्या वतीने बोपोडी येथील कै. संजय गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष (साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग) मा. अभिजीत सिद्धार्थ वाघमारे यांनी आमदार मा. रोहित दादा पवार यांना निवेदन दिले.
या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. प्रशांत दादा जगताप, युवक शहराध्यक्ष मा. किशोर कांबळे, विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष मा. विक्रम जाधव तसेच चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष मा.
राजेंद्र आलमखाने उपस्थित होते.
राजेंद्र आलमखाने उपस्थित होते.
बोपोडी परिसरातील नागरिकांची वाढती लोकसंख्या, गरिब व मध्यमवर्गीय घटक तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना तातडीच्या आरोग्य सेवांची आवश्यकता आहे. सध्या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी ससून, येरवडा किंवा पिंपरी-चिंचवड येथे जावे लागते. त्यामुळे गरजूंना वेळेत आरोग्यसेवा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय लवकर सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार असून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांनी यावेळी सांगितले.
Tags:
Maharashtra