मोठी बातमी : पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क

मोठी बातमी : पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क


मोठी बातमी : पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क

पिंपरी : मुंबईनंतर आता पिंपरी-चिंचवड शहरात देखील यंदाचा पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. ४२ वर्षीय एका पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संबंधित रुग्ण सध्या घरीच उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.



राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत ५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये देखील रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, नियमितपणे हात धुवावेत आणि डोळे, नाक, तोंडाला हात लावणे टाळावे, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – डॉ. लक्ष्मण गोफणे

महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्ण घरीच उपचार घेत असून त्याची तब्येत चांगली आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही,” असे स्पष्ट मत आरोग्य विभागाचे डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केले.

सध्या आरोग्य यंत्रणा सतर्क असून, संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

Comments System

Facebook